Share

Amol Mitkari | “ज्यांच्या डोक्यात शेण भरलं आहे, त्या व्यक्तीला…”; पडळकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अमोल मिटकरींचा पलटवार 

Amol Mitkari | नागपूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात ‘संघर्ष’ नावाच्या पुस्तकाचे वाटप केले. यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गोपीचंद पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“महापुरुषांचा अपमान करणारी जी घाण त्यांच्या मेंदूत आहे, ती बाहेर गेली पाहिजे. तोही एक उद्देश होता. पण ज्याच्या मेंदूमध्ये शेणच भरलेलं असेल, त्या व्यक्तीला पुस्तकाचं महत्त्व कसं कळेल,” असा टोला अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी लगावला आहे.

ते म्हणाले, “जी व्यक्ती पुस्तकं वाचत नाही. त्या व्यक्तीला टीका करण्याव्यतिरिक्त काही धंदा असेल, असं मला वाटत नाही. आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालंय. गेल्या काही दिवसांत जाणीवपूर्वक सीमावाद सुरू केला आहे, महामानवांचा अपमान केला जात आहे. यामुळे आमच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून महापुरुषांच्या विचारांची पुस्तकं सर्वांना देण्यात आली.”

“भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना महापुरुषांबद्दल आदर नाही, यामुळे केवळ त्यांनाच ही पुस्तकं वाचायला दिली आहेत, असं अजिबात नाही. भाजपा नेत्यांच्या मनात महापुरुषांबाबत आदर वाढवा, म्हणून ही पुस्तकं दिली आहेत”, असं अमोल मिटकरी म्हणालेत.

गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य काय?

“रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या रोहित पवारांना संघर्ष शब्दाचा अर्थ तरी कळतो आहे. रोहित पवारांनी असा कोणता संघर्ष केला आहे, की ते ‘संघर्ष’ नावाचं पुस्तक वाटत आहेत, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केलीय.

महत्वाच्या बातम्या :

Amol Mitkari | नागपूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात ‘संघर्ष’ नावाच्या पुस्तकाचे वाटप केले. यावरून भाजपाचे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nagpur Politics Video

Join WhatsApp

Join Now