Share

Amol Mitkari | “… म्हणून अब्दुल सत्तारांनी कुत्रा ‘ही’ निशाणी मागितली होती”, अमोल मिटकरी सत्तारांवर कडाडले

Amol Mitkari | मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांच्या बाबत अतिशय अक्षेपार्ह क्तव्य केलं आहे. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते प्रचंड आक्मक झाले आहेत. अशातच राष्ट्रवादी पक्षाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर एकेरी भाषेत जोरदार घणाघात केला आहे.

अब्दुल सत्तारच्या एका भाषणात “मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल ” असा शब्दप्रयोग होता .आता महाराष्ट्राच्या जनतेने समजून घ्यावं याने कुत्रा निशाणी कशाकरिता मागितली कारण, हा त्याच लायकीचा आहे, असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसं ट्विट देखील त्यांनी केलं आहे.

पाहा ट्विट –

दरम्यान, तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं त्या म्हणाल्या आहेत यावर तुम्ही काय सांगाल? असं अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी दिलीय. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं असल्याचा हा व्हिडीओ आहे.

यावर अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी मी कोणत्याही महिलेबाबत अपशब्द काढलेले नाहीत. जे लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याबद्दल मी बोललो होते. सुप्रिया सुळे यांचे तसेच कोणत्याही महिलेचे मन दुखेल असा कोणताही शब्द मी बोललेलो नाही. मी बोलल्यामुळे महिला भगिनींची मनं दुखली असतील तर, मी जरूर खेद व्यक्त करेन. परंतु मी असे काहीही बोललेलो नाही, असं सत्तार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Amol Mitkari | मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांच्या बाबत अतिशय अक्षेपार्ह क्तव्य केलं …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now