Share

Amol Mitkari । “भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच”; अमोल मिटकरी यांचं भाकीत

सातारा : गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानाच्या समारोप कार्यक्रमात आमदार मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.  सत्तेचा आणि पैशाचा उन्माद असणाऱ्या चुकीच्या लोकांना निवडून देऊन पुन्हा चूक करू नका असं म्हणत त्यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. भारतीय जनता पार्टीचा उन्माद थांबवण्याची ताकद फक्त शरद पवार यांच्यातच आहे. राष्ट्रवादीला चांगले दिवस आले असल्याने भावी मुख्यमंत्री  होईल, असं भाकीत अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

आमदार मिटकरी म्हणाले, जनसामान्यांच्या विकासाच्या प्रश्नावर उपाययोजना आखणारे प्रभाकर देशमुख हे जनतेचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेत गेले. तर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकांना न्याय मिळेल. विकासाच्या संकल्पना साकारण्यासाठी मदत होईल. सत्तेचा, पैशाचा उन्माद असणारी चुकीचे लोक पुन्हा निवडून देऊ नका.

अंधेरीची जागा आम्हीच जिंकणार

अंधेरीच्या पोटनिवडणूकीची जागा महाविकास आघाडी जिंकेल. चिन्ह जरी गोठवलं असलं तरी शिवसैनिकांचे रक्त पेटवले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे अंधेरीची जागा महाविकास आघाडी जिंकणार आणि मुंबई महापालिकेत सुद्धा भगवा फडकवणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

भाजपाचा उन्माद थांबवण्याची ताकद फक्त पवार साहेबांमध्येच आहे. म्हणूनच राष्ट्रवादीला बळकट करा. बाळासाहेब देवरस या आरएसएसच्या देवाचे नाव शिंदे गटाला मिळालंय. हा शिंदे गट भाजपात विलीन व्हावा हीच देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे. पण, लवकरच हे सरकार पडेल. डिसेंबरमध्ये गुजरातच्या बरोबर कदाचित महाराष्ट्रातही निवडणूका लागतील. आपण या निवडणुकीसाठी तयारी करावी, असं आवाहन देखील अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

सातारा : गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानाच्या समारोप कार्यक्रमात आमदार मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Satara

Join WhatsApp

Join Now