९० टक्के मतदान झाले तर आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही : मिटकरी

amol mitkari

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे.

शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी भंडारा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी यावेळी बोलताना अमित शहा म्हणतात शरद पवारांनी देशाला काय दिल. अहो तुमच्यात ७० टक्के लोक हे राष्ट्रवादीचेच आहेत हे तरी लक्षात घ्या अशा शब्दात अमित शाह यांना प्रत्युत्तर दिले आहे.

तसेच पुढे बोलताना मिटकरी यांनी ‘आज आपल्याकडे बाबासाहेबांच्या नावाचे देशात नागपूर येथील एकच विमानतळ आहे. जे राष्ट्रवादीच्या प्रयत्नातून पूर्ण करण्यात आले. त्यामुळे जर ९० टक्के मतदान झाले तर आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही असं विश्वास मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

दरम्यान मिटकरी यांनी यापूर्वीच्या सभेत ‘जर बॅलटवर निवडणूक घेतली तर या सरकारच्या केवळ ११ जागा येतील. आणि आघाडीचे २७७ जागा येतील यात शंकाच नाही असं विधान केले होते. दरम्यान या सभेला राष्ट्रवादीचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.