‘राफेलवर लिंबू मिर्ची ठेऊन अकलेचे दिवाळे काढणाऱ्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा’, अमोल मिटकरींची टीका

अकोला : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा याने भालाफेक या क्रीडाप्रकारात भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. त्या अनुषंगाने नीरजचे पुण्यातील आर्मी स्टेडियमला देण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरव करत इतिहासाचे काही दाखले दिले.

‘ज्या भूमीवर आपण एकत्र आलो आहोत, तिचा इतिहास पाहा. हा खेळच होता ज्याने शिवा नावाच्या एका मुलाला छत्रपती शिवाजी महाराज बनवलं. स्वामी रामदास, दादोजी कोंडदेव आणि जिजाऊ माँसाहेब लहानपणापासूनच त्यांना अशी शिकवण दिली होती, ज्यातून ते एक राष्ट्रनायक बनले. भारतीय सेनाही त्या परंपरेला पुढे घेऊन जात आहे.’असे भाष्य यावेळी राजनाथ सिंह यांनी केले होते.

मात्र, त्यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादीचे खासदार अमोर कोल्हे यांनी त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घेत निषेध केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनीही संरक्षण मंत्र्यांवर टीका केली आहे.

‘देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इतिहासाचा अभ्यास शून्य आहे. राजनाथ सिंह यांनी पुण्यात एक चुकीच विधान केले आहे. जिजामाता आणि शहाजी महाराज यांनी शिवाजी महाराजांना संस्कार दिले. आणि त्यानंतर १६७४ ला शिवाजी महाराज छत्रपती झाले असा इतिहास आहे. मात्र, काही लोकांनी त्यांना वेगळी माहिती दिली त्यामुळे बालिश वक्तव्य केले. राजनाथ सिंह यांना सांगू इच्छितो तुम्ही राफेल खरेदी करायला गेले होतात त्यावेळी त्यांनी लिंबू मिर्ची ठेऊन आकलेचे दिवाळे काढले होते. त्यावेळी पूर्ण जग हसलं होतं. त्यामुळे अशा व्यक्तीने शिवाजी महाराज यांच्याबाबत अभ्यास नसेल तर त्यांनी तो अभ्यास करायला हवा अशी टीका मिटकरी यांनी केली.

तसेच राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घ्यावा. त्याचा अभ्यास करावा आणि त्यानंतर बोलावं. जर त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात नाक खुपसलं तर त्यांची शुर्फनका करू असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी राजनाथसिंह यांना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या