मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मविआ सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. तर काही निर्णयांवर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून मविआ नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी थेट निधीवरून शिंदे सरकारवर टीका केली आहे.
“आपल्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात निधी द्यायचा आणि उर्वरित मतदार संघातील निधीला स्थगिती त्यातही मातोश्री पाणंद रस्ते योजना अशा ज्या महत्त्वाच्या शेतकरीहिताच्या योजना आहेत त्याला स्थगिती देऊन नेमकं काय साध्य करायचं आहे?”, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे.
आपल्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात निधी द्यायचा आणि उर्वरित मतदार संघातील निधीला स्थगिती त्यातही मातोश्री पाणंद रस्ते योजना अशा ज्या महत्त्वाच्या शेतकरीहिताच्या योजना आहेत त्याला स्थगिती देऊन नेमकं काय साध्य करायचं आहे?@mieknathshinde @Dev_Fadnavis
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 17, 2022
तसेच विकास कामांना स्थगिती देणे हा निर्णय जनतेच्या दृष्टीने अत्यंत चुकीचा आहे. मागच्या काळात अर्थमंत्री अजितदादा यांनी नगर विकास खात्याला 21000 कोटीचा निधी दिला होता. बंडखोर आमदार शहाजी बापूंना सुद्धा कोट्यावधीचा निधी मिळाला. सत्तेचा ताम्रपट कायमस्वरूपी नसतो. असा टोला मिटकरी यांनी हाणला आहे.
रोहित पवारांच्या मतदारसंघातील ‘त्या’ निर्णयाला स्थगिती-
“माझ्या मतदारसंघातील पक्षकारांची ‘तारीख पे तारीख’ या त्रासातून सुटका व्हावी आणि वकीलांचीही सोय व्हावी म्हणून गेली दोन-अडीच वर्षे पाठपुरावा करुन मविआ सरकार असताना मी कर्जतला दिवाणी न्यायालय मंजूर करुन आणलं. पण या सरकारने सत्तेत येताच या निर्णयाला स्थगिती दिली.”, असा संताप व्यक्त करत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
“कदाचित, राज्य पातळीवरील मोठ्या निर्णयांना स्थगिती देताना तालुका पातळीवरील दिवाणी न्यायालयासारख्या छोट्या निर्णयालाही स्थगिती देण्याचा निर्णय अनावधानाने झाला असावा. त्यामुळं माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, याबाबत आपण व्यक्तिशः लक्ष घालून या निर्णयावरील स्थगिती उठवावी.”, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut । मला भविष्यात होणाऱ्या दुर्घटनाही माहिती आहेत – संजय राऊत
- Rohit Pawar : “केलेल्या कामाचं श्रेय घ्यायला हरकत नाही पण…”,रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- Sadabhau Khot : “संधी साधून सोयीस्कर लाईव्ह येणारे उध्दव साहेब…”, सदाभाऊंचा अजित पवारांवर निशाणा
- Sanjay Raut : “केसरकर, उदय सामंत पवारांच्याच शाळेचे प्रमाणपत्र घेऊन..”, संजय राऊतांचा टोला
- Sanjay Raut : “राज्य दिल्लीपुढे झुकणाऱ्या बाजारबुणग्यांच्या हाती…”, संजय राऊतांचा शिंदे सरकारवर निशाणा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<