Share

Amol Mitkari | “सुरतमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या बहाद्दर आमदारांनो…”; सीमाप्रश्नावरून अमोल मिटकरींचा शिंदे गटावर हल्लाबोल 

Amol Mitkari | मुंबई : बेळगाव येथे महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. यांनतर विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी ट्विटच्या माध्यमातून शिंदे गटाला टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी शिंदे गटाला खुलं आव्हान दिलं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही सुरतमार्गे गुवाहाटीला गेला, त्याप्रमाणे बेळगावमार्गे कर्नाटकात जाऊन याच, असं मिटकरींनी म्हटलं आहे. त्यांनी ट्वीट करत शिंदे गटावर बोचरी टीका केलीय.

 

सुरतमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या महाराष्ट्रातील बहाद्दर आमदारांनो… महाराष्ट्र संकटात आहे. हिंदुत्व धोक्यात आहे. हिंमत दाखवा आणि बेळगावमार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच…”, अशा आशयाचं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

दरम्यान, “रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?”, असा प्रश्न रोहित पवारांनी देखील मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Amol Mitkari | मुंबई : बेळगाव येथे महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now