Share

NCP| “काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार”

मुंबई:  एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून राज्या सरकार स्थापन केल्यापासून शिवसेना पक्षामध्ये मोठी दरी निर्माण झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट दिसू लागले. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप, टीका केल्या जात आहेत. त्याचबरोबर पुढील काही दिवस दोन्ही गटांसाठी खूप महत्वाचे असणार आहेत. कारण शिवसेना पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार, याचा निकाल होणार आहे. यावरून राज्यात अनेक चर्चा रंगल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी ?

काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. अमोल मिटकरी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. धनुष्यबाणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच अधिकार होता, आहे आणि राहील.जरी दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्या असून निकाल दिला नसला, तरी आम्हाला वाटतं की उद्धव ठाकरेंकडे चिन्ह राहील, असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.पुढे बोलताना मिटकरी म्हणाले की, न्यायालय यावर निकाल देईल. मात्र शिवसेनेची एक आचारसंहिता आहे. त्यालाही महत्व आहे. त्यामुळे धनुष्यबाण ठाकरेंकडेच राहील.

शिंदे सरकारचे 100 दिवस पूर्ण झालेत. मी शेतकरी म्हणून याकडे पाहतो. 100 दिवसात रेकॉर्ड ब्रेक शेतकऱ्यांच्या बाजूने कोणता निर्णय झाला हे यांनी छातीवर हात ठेवून सांगा. अजूनही शेतकऱ्याला कोणतीही मदत मिळालेली नाही. आता 100 रुपयात धान्य देतायत. पण शेतकरी यात समाधानी नाही.

त्यामुळे राज्य सरकारचे 100 दिवस वाया गेले आहेत. नवरात्र, दहीहंडी, गरबा या धार्मिकतेतच नागरिकांना गुंतवून ठेवतायत. पण इथले रोजगार का गेले? इथल्या शेतकऱ्याला मदत का मदत मिळाली नाही? त्यामुळे या सरकारच्या कार्यकाळावर शेतकरी नाखूश आहे. ज्या राज्यात शेतकरी नाखूश असेल किंवा उद्विग्न असेल तो राजा किंवा ते राज्य जास्त दिवस टिकत नसतं, असं मिटकरी यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या:

मुंबई:  एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून राज्या सरकार स्थापन केल्यापासून शिवसेना पक्षामध्ये मोठी दरी निर्माण झाली. त्यानंतर एकनाथ …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics