विनोद तावडे यांना जोडे मारो आंदोलन करणार – अॅड. अमोल मातेले

अॅड. अमोल मातेले

मुंबई (हिं.स.) : मुंबई विद्यापीठाने निकाल रखडवल्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आतापर्यंत पाच आंदोलन केली असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी दिली. तसेच अनेकवेळा निवदेन देत परिक्षा शुल्क कमी करणे, तसेच विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला होता. तरिही कोणतीही उपाययोजना विद्यापीठाने केली नाही. त्यामुळे आता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना जोडे मारो आंदोलन करणार असल्याचे मातेले यांनी सांगितले. ज्या कंपनीने पेपर तपासणीचा घोळ केला त्या मोरिटट्रॅक कंपनीला पुन्हा पुढील वर्षांसाठी काम दिलेले आहे. आणखी काही कंपन्यांना पेपर तपासणीचे काम द्यावे, अशी मागणी मातेले यांनी केली.Loading…
Loading...