अमोल कोल्हेंचा वारकरी अंदाज घेतोय सर्वांचे लक्ष वेधून

मुंबई: २० जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र तसेच शेजारील राज्यातील पायी चालत पंढरपुरला येतात. मात्र कोरोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या दिवशी पायी वारीला सरकारने परवानगी नाकारली आहे. यामुळे भावीक जवळ असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरात दर्शन घेत आहेत.

तर अनेक कलाकार आणि राजकारणी सोशल मीडीयाच्या आधारे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहेत. याच पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडीयावर वारकरी अंदाजातील एक फोटो पोस्ट केला आहे. टभाळी चंदनाचा टीळा ,गळ्यात घेतली वीणा; नित्य आम्हा लागला, पांडुरंगा तुझ्या नामाचा लळाट असे कॅप्शन दिलेली त्यांची ही पोस्ट चाहत्याच्या पसंतीला पडत आहे.

झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप भावली होती. अभिनयासह अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर येथील लोकसभा खासदार आहेत. अभिनय आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेले अमोल कोल्हे यांचा वारकरी अंदाज समाज माध्यमावर चांगलाच वायरल होत आहे. सध्या ते सोनी मराठी या वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP