Amol Kolhe | मुंबई : भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचं म्हटलंय. त्यांच्या वक्तव्यानंतर विविध स्तरातून त्यांचा निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादीनं त्यांचा व्हिडीओ शेअर करत, दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असं म्हटलं होतं. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “काय ते अगाध ज्ञान! इतिहासाला कोड्यात टाकणारा हा इतिहास! वा गुरूजी, जन्म कोकणातील, स्वराज्याची शपथ रायगडावर, बालपण रायगडावर! तुम्हाला चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात घेण्याची गरज आहे.”
अध्यक्ष महोदय,माझी विनंती आहे की अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे. अन्यथा आम्हाला तरी सांगावे की हा इतिहास कुठे शिकावा, कुणी सांगावा? टीपः- हसावे की रडावे या पलीकडील उद्विग्नता आहे, अशा आशयाचं ट्विट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.. अन्यथा आम्हाला तरी सांगावे की हा इतिहास कुठे शिकावा, कुणी सांगावा?
टीपः- हसावे की रडावे या पलीकडील उद्विग्नता आहे..— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 4, 2022
निषेध किंवा धिक्कार करणे पालथ्या घड्यावर पाणी आहे.. पुन्हा इतिहास रूजवावा लागणार, जागवावा लागणार!, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी प्रसाद लाड यांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हणालेत प्रसाद लाड?
“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं प्रसाद लाड म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- Prasad Lad | शिवरायांवरील विधानानंतर प्रसाद लाड यांनी व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले,
- Sanjay Raut | “भाजपाचं डोकं फिरलंय, शिवरायांची भवानी तलवारच एक दिवस…”; ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊत संतापले
- Sanjay Raut | “ते चाळीस आमदार स्वतःला सरकारचे बाप…”; संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल
- Raj Thackeray | प्रसाद लाड यांच्या शिवरायांवरील विधानानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले,
- Udayanraje Bhosale | “मुजरा महाराज…सर्वसामान्य मावळा म्हणून बोलतोय…”; उदयनराजेंचं छत्रपती शिवाजी महाराजांना भावनिक पत्र