‘पवारांनी काय केलं, तर जनतेला स्वाभिमानाने उभं राहायला शिकवलं’

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. तिसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी भंडारा येथे ही यात्रा आली होती होती. यावेळी झालेल्या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी ‘महाजनादेश यात्रा ही कोणतेही शासकिय यात्रा नाही. तरीही राज्याचे गृह मंत्री आपल्या सत्तेचा गैरवापर करताना आपण मुकाट्याने बघत आहोत. हेच चित्र आपल्यापुढे मांडण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा निघाली आहे असं विधान केले. तसेच त्यांनी भंडारा जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक समस्यांवर प्रकाश टाकला.

पुढे बोलताना कोल्हे यांनी ‘अमित शहा तुम्ही प्रश्न विचारला पवारांनी काय केलं, तर पवार साहेबांनी जनतेला स्वाभिमानाने उभं राहायला शिकवलं. २०१४ सालची या सरकारची सगळी आश्वासनं आठवा. या सरकारने आज तो सर्व लेखा जोखा जनतेपुढे मांडण्याची गरज आहे. ५४ वर्षाचे कर्ज हे २ लाख कोटी आणि या सरकारने पाच वर्षात पाच लाख कोटी कर्ज करून ठेवले आहे असं विधान केले आहे.

दरम्यान, याच सभेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मिटकरी यांनी जर ९० टक्के मतदान झाले तर आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही असं विश्वास व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.