महाजनादेश यात्रेला काळे झेंडे दाखवले जात आहेत तर आमच्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय

शिर्डी : शिवस्वराज्य यात्रा शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात झाली. रोज तीन विधानसभा मतदारसंघ जात आहोत. ६ ते २८ ऑगस्टपर्यंत चालू राहणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेला राज्यात काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे एक लादलेली यात्रा आणि दुसरी उत्स्फूर्त जनतेसाठी यात्रा हा फरक असल्याचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी शिर्डीतील पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यातील पूरपरिस्थितीला भाजप सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातील जनता पुरात अडकली आहे. सातारा, सांगली जिल्हयातील १ लाखापेक्षा लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कर्नाटकात भाजप, महाराष्ट्रात भाजप आहे. केंद्रातही सरकार भाजपाचे सरकार असतानाही योग्य तो निर्णय घेतला गेला नाही असं म्हटलं आहे.

धरणातील पाण्याचा विसर्ग करावा लागतो. कर्नाटक राज्यातील अलमट्टी हे धरण कोयनेपेक्षा चारपटीने मोठे आहे. त्यातून पाणी पुढे जात नाही. त्यातील पाण्याचा फुगवटा महाराष्ट्रातील सांगली सातारा जिल्हयात मारला गेला आहे. कर्नाटक सरकारने धरणाचे पाणी सोडताना सुचना द्यायला हवे होती परंतु त्यांनी काही केले नाही असा आरोपही अजित पवार यांनी केला.

रस्ते, पुल वाहून जात आहेत. इमारती पडत आहेत याबाबत सरकार नियोजन करत नाहीय. तीन वर्षे झाली कर्जमाफी दिली नाही, पीक विमा याबाबत स्पष्टता नाही. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. आघाडीच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाणार आहे. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना हा युतीचा अनुभव सर्वांना पाहायला मिळत आहे अशी टिकाही अजितदादा पवार यांनी भाजप – सेनेच्या युतीबाबत केली. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या विचाराला तिलांजली देण्याचे काम या भाजप सरकारकडुन सुरु आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला.

सरकार दोन समाजामध्ये भांडण लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतंय

उस्मानाबाद जिल्हा वार्षिक योजनेतील निधीच्या वाटपाचे निर्देश : तानाजी सावंत