दोन कोरोना पॉझिटिव्ह राजकीय नेत्यांच्या संपर्कात आल्याने अमोल कोल्हे क्वारंटाइन

amol kolhe

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. लोकप्रतिनिधी अनेक लोकांच्या संपर्कात येत असल्याने आणि त्यांनाच कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यातच आता राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घेतली. ती निगेटिव्ह आली, मात्र खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन व्हायचे ठरवल्याची माहिती डॉ. कोल्हे यांनी ट्वीट करुन दिली.

अमोल कोल्हे यांचे ट्वीट काय?

‘आपल्याला एक महत्वाची माहिती शेअर करत आहे. एक जुलै ते चार जुलै या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर होतो. दौऱ्याच्या काळात संपर्क आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. हे समजल्यानंतर मी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे.’ अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली.

‘माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र पुरेशी खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात अथवा दौऱ्यावर असताना, अनेकदा नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. काही जण मास्कचा वापर करीत नाहीत.’ असेही कोल्हे यांनी म्हटले आहे.

पुणे : खा. अमोल कोल्हेंचा जनता दरबार; कामगारांच्या तक्रारीवर कोल्हेंची प्रतिक्रिया म्हणाले…

धक्कादायक : सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण

धनगर आरक्षण समितीचा आमदार पडळकरांना दणका, घेतला हा निर्णय…