भ्रष्टाचारी मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून सिंगल विंडोतून क्लीनचीट : अमोल कोल्हे

dr amol kolhe

पैठणः पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या शिवसेना-भाजप युतीतील 22 मंत्र्यांच्या भ्रष्टाचारीची प्रकरणे आम्ही शोधून काढली होती. पण मुख्यमंत्र्यांनी सिंगल विंडो योजना राबवत सगळ्यांना क्‍लीनचीट देऊन टाकली अशी टिका राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पैठण येथील शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात केली.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या मेगाभरतीवरून कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. ते म्हणाले, या सरकारमधील बावीस मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही बाहेर काढली होती. पुराव्यासह त्यांच्या चौकशीची मागणी केली. पण मुख्यमंत्र्यांनी त्या सगळ्यांना क्‍लीनचीट दिली. पाच वर्षांत पैठण तालुक्‍यातील एमआयडीसी मध्ये उद्योग धंदे आले का?, किती मुलांना रोजगार मिळाला असा सवालही कोल्हे यांनी केला.

Loading...

यावेळी 1 लाख 22 हजार कंपन्या बंद झाल्याचा दावा करतांनाच बेरोजगारांचे तांडे आज महाराष्ट्रातील नाक्‍यांवर दिसातेयत. हे सगळं घडत असताना सत्ताधारी भाजप-सेनेचे नेते यात्रा काढतातच कशा? हे लोकांनी त्यांना विचारायला हवे असे आवाहन देखील कोल्हे यांनी केले. महाराष्ट्रावर आपत्ती आली, तेव्हा कोण काम करत होते हे मिडियाने दाखवले त्याबद्दल मिडियाचे आभार देखील त्यांनी मानले.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले