पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्याची कामे मार्गी लागणार : अमोल कोल्हे

मंचर : नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. येत्या 2 व 17 मार्च रोजी निविदा उघडणार आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेली बाह्यवळण रस्त्याची कामे मार्गी लागणार आहेत. अशी माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगर, मंचर, चांडोली व आळेफाटा येथील जून महिन्याच्या अखेरीपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना कोल्हे म्हणाले, ‘भूसंपादनास असणारा नागरिकांचा विरोध व अन्य कारणांमुळे रखडलेली बाह्यवळण रस्त्यांची कामे मार्गी लावून वाहतूक कोंडीतून जनतेची सुटका करण्यासाठी सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतलेल्या आहेत. तसेच भूसंपादनातील बहुतांशी आक्षेपांचे निराकरण करण्यात यश आले आहे. दिल्लीत अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला.

Loading...

नारायणगाव व खेड घाटाचे बाह्यवळण रस्त्याचे काम गतीने सुरू आहे. याठिकाणी मार्च अखेरपर्यंत एकेरी वाहतूक सुरू करण्याचे आदेश संबधित जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कंत्राटदाराला दिले आहेत, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

नाशिक फाटा ते चांडोली या टप्प्यातील रस्त्याला प्राधान्य देणार असून, पिंपरी-चिंचवड हद्दीतील भूसंपादनाचे क्षेत्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात येण्यास लागणारा विलंब लक्षात घेऊन या महामार्गाचे नाशिक फाटा ते मोशी (इंद्रायणी नदीपर्यंत) आणि मोशी ते चांडोली, असे दोन भाग केले आहेत. मोशी ते चांडोली या टप्प्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया येत्या 2 महिन्यात पूर्ण करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका