fbpx

राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधून ‘अमोल कोल्हे’ झाले ‘मिस्टर इंडिया’; प्रचारातून गायब

टीम महाराष्ट्र देशा –  आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहेत. त्यात आता लोकसभेच्या ऐन प्रचाराच्या वेळेस अमोल कोल्हे गेल्या चार दिवसांपासून गायब आहेत. त्यामुळे प्रचाराची तयारी केलेले त्यांचे कार्यकर्ते अतिशय त्रस्त आहेत.

दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार,अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात पदयात्रा काढल्या सभा घेतल्या. पण गेल्या चार दिवसांपासून त्यांचा प्रचारचं बंद पडला आहे. ते मुंबईत शूटिंगसाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हेंच्या प्रचाराची पूर्ण तयारी केली आहे. तसेच त्यांच्याशी संपर्के साधण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले पण ते शूटिंग मध्ये व्यस्त असल्याचे समजते.

डॉ अमोल कोल्हे यांच्याशी काही संपर्क होऊ शकत नसल्याने तालुक्यातील कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत. उमेदवाराने एकदा तरी गावात येऊन जावे अशी कार्यकर्त्यांची मागणी असते मात्र त्यानं प्रतिसादच मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. त्यामुळे आता शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी फटका बसणार की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे

राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यासमोर आव्हान उभे करण्यात आले होते पण आता हे आव्हान नक्की कोणासमोर असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, शिवसेनेचे स्टार प्रचारक नेते अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला राम राम ठोकून राष्ट्रवादीचे घडयाळ हातात बांधले. तसेच शरद पवार यांचा तगडा उमेदवार म्हणून अमोल कोल्हे याना शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तिकीट जाहीर करण्यात आलं

2 Comments

Click here to post a comment