अखेर शिवबंधन तोडत डॉ अमोल कोल्हेंनी बांधले हातावर घड्याळ

dr amol kolhe

टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून ओळखले जाणारे सिने अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते लवकरच शिवसेना सोडणार असल्याचं बोलल जात होत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत डॉ. कोल्हे यांनी पक्षप्रवेश केला.

आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात माझ्याकडे तगडा उमेदवार असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं होतं. मात्र , आता तो तगडा उमेदवार हे अमोल कोल्हे असल्याचे जवळपास स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे स्टार प्रचारक असणारे कोल्हे राष्ट्रवादीत गेल्याने सेनेला धक्का मानला जात आहे. अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिकेतही काम केले. या दोन्ही मालिकांमुळे ते राज्यातील घराघरामध्ये पोहचले आहेत.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...