अमोल कोल्हेंनी समजावून सांगितला ‘कोरोना’चा गुणाकार; नेमका कोरोना कसा पसरतो?

पुणे : राज्यभरात मंगळवारी ८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. नवीन रुग्णांमध्ये ५९ रुग्ण मुंबईचे आहेत. १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर ५ रुग्ण पुणे, ३ अहमदनगरचे आणि २ बुलडाणा येथील आहेत.

कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडून कोविड-१९ च्या रोगाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी ‘लॉकडाउन’चे पालन होत नसल्याने नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या विषाणूचा गुणाकार समजवून सांगितला आहे. नियमांचे उल्लंघन करुन मुंबईहून एक व्यक्ती जुन्नरला आली. 17 मार्चला ही व्यक्ती अनेकांना भेटली. त्यानंतर मुंबईहून आलेल्या या व्यक्तीला 27-28 मार्चला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचं आढळून आलं. याबाबत चे वृत्त tv9मराठी ने दिलं आहे.

मुंबईवरून आलेल्या त्या व्यक्तीचा दुसऱ्या डिंगोरेच्या नागरिकाच्या संपर्कात आला. आणि डिंगोरेच्या नागरिकालाही कोरोना विषाणूची लागण झाली. डिंगोरेच्या नागरिकाला 31 तारखेला लक्षणं आढळली. म्हणजेच 17 मार्च ते 30 मार्च या कालावधीत तो अनेकांना भेटला असेल. म्हणजेच या रुग्णाच्या शरीरात कोरोना विषाणू हा 14 दिवस होता.

दरम्यान, याचाच अर्थ 30 मार्चला तो ज्या कोणाच्या संपर्कात आला असेल, त्याला 13 एप्रिलनंतर लक्षणं दिसून येतील. अशा पद्धतीने कोरोणाचा गुणाकार होत आहे, असं कोल्हे यांनी सांगितले. सर्वांनी काळजी घ्या, बाहेर पडू नका, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.