बाप सरदार असला की मुलगा सरदार व्हायला पाहिजे असं नसतं, कोल्हेंचा रामदास कदमांना टोला

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निघालेली राष्ट्र्वादी कॉंग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज रत्नागिरी येथे दाखल झाली. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे शिवस्वराज्य यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी संबोधित करताना शिवसेनेला लक्ष्य करत चांगलेच टोले मारले. बाप सरदार असला म्हणून मुलगा सरदार व्हायला पाहिजे असं काही नसतं, असे म्हणत शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि पुत्र योगेश कदम यांना टोले मारले.

यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, काळाच्या पुण्याईवर आजचा दिवस स्वराज्यात उगवत नव्हता. त्या छत्रपतींची ही भूमी आहे. खेडवासियांनी याचा विचार करावा. आपल्या अडचणीत साथ देतो त्याला आपण साथ द्यायची की वरून आलेले पार्सल आपण डोक्यावर घेऊन मिरवायचं याचाही विचार मतदारांनी करावा. शिवसेनने आता पर्यंत कोकणासाठी काय केल ?, असाही सवाल कोल्हे यनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम हे संभाव्य उमेदवार आहे. मतदारांनी याची काळजी करू नये, राष्ट्रवादीच्या वतीने मी शब्द देतो संजय कदम यांना निवडून द्या, असं अमोल कोल्हे म्हणाले.