‘पुढून, मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही’

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. यानिमित्त अनेक नेते विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे प्रचारानिमित्त अहमदनगर येथे आले असता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, अंगाला तेल लावून बसलोय, समोर पैलवान नाही, पुढून, मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेक सभांमध्ये बोलताना अशी विधाने केली होती.

पुढे बोलताना कोल्हे यांनी ‘जर समोर पैलवान नसतील देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याठिकाणी आखाडा खणायला येतायेत का? लहानपणी आमच्यावर संस्कार होते. जर मुलगा परिक्षेत नापास झालं तर बापाला घेऊन यावं लागतं, आता ते तुम्ही समजा काय झालं अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी येणारी विधानसभा निवडणूक ही उमेदवारांमधील लढाई नाही, पक्षांची लढाई नाही, तर दोन विचारांची लढाई आहे. शाहु-फुले आंबेडकर यांच्या विचारांची लढाई आहे. आपल्या मुलांना रोजगार मिळणार की नाही. त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवायचं की नाही हे ठरविणारी निवडणूक आहे असं कोल्हे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या