संतांच्या भूमीवर बये दार उघड म्हणण्याची वेळ आली, अमोल कोल्हेंची सरकारवर खोचक टीका

टीम महाराष्ट्र देशा : पैठण तालुक्यात विकासाचे प्रश्न गंभीर असून या भागातील आमदारांनी काय केले असा प्रश्न जन अशिर्वाद यात्रेतील युवराजांना विचारावा, असे म्हणत राष्ट्रवादीचे शिरूरचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना टोला लगावला. विकासाच्या प्रश्नावर संताच्या भुमीवर बये दार उघड म्हणण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निघालेली शिवस्वराज्य यात्रा आज पैठण येथे आली. यावेळी संत एकनाथांच्या भूमीत विरोधकांनी सत्ताधारी भाजप-सेना युतीला चांगलेचं खडे बोल सुनावले. यावेळी कोल्हे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात येणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेची खबर लागताचं भाजपच्या चाळीस पैशांच्या लावरीसांमध्ये पोठसूळ उठला, शिवस्वराज्य यात्रा का काढता, असं आम्हाला विचारलं जात. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या एकट्याची जहागीरी आहे का ?, असा खोचक सवाल कोल्हे यांनी यावेळी उपस्थित केला.

Loading...

दरम्यान, यावेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारकडून कडाडून टीका केली आहे. राज्यातील भाजप सरकार असंवेदनशील आहे, पुरामध्ये माणसांचे प्राण जात असताना मंत्री फोटो काढत फिरतायत. जनतेची कसली टिंगलटवाळी चालली आहे, सरकारला कसली मस्ती आली आहे, अशी टीका पवार यांनी केली.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू