शिवस्वराज्य यात्रेची खबर लागताचं भाजपच्या चाळीस पैशांच्या लावरीसांमध्ये पोठसूळ – खा. कोल्हे

dr amol kolhe

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात येणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेची खबर लागताचं भाजपच्या चाळीस पैशांच्या लावरीसांमध्ये पोठसूळ उठला, शिवस्वराज्य यात्रा का काढता, असं आम्हाला विचारलं जात. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या एकट्याची जहागीर आहेत का ?, असा प्रश्न करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर टीका केली आहे. शिवस्वराज्य यात्रे दरम्यान पैठण येथे आयोजित सभेत कोल्हे बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून देखील थेट जनतेशी संवाद साधला जात आहे. खा अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापूर व सांगलीमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मध्यंतरी शिवस्वराज्य यात्रा स्थगित करण्यात आली होती. आजपासून पुन्हा एकदा यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारकडून कडाडून टीका केली आहे. राज्यातील भाजप सरकार असंवेदनशील आहे, पुरामध्ये माणसांचे प्राण जात असताना मंत्री फोटो काढत फिरतायत. जनतेची कसली टिंगलटवाळी चालली आहे, सरकारला कसली मस्ती आली आहे, अशी टीका पवार यांनी केली.