सरकार दोन समाजामध्ये भांडण लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतंय

टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबादच्या गंगापूर येथे काल दुसऱ्या दिवशी शिवस्वराज्य यात्रा पोहचली. विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मराठा समाजासाठी गोदावरी नदीत उडी मारुन बलिदान दिलेल्या काकासाहेब दत्तात्रय शिंदे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आणि अभिवादन करून यात्रेला सुरवात केली. खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेतील दुसऱ्या दिवशी सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडलं.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होत असल्याचा आरोप सुद्धा कोल्हे यांनी यावेळी केला. सरकार दोन समाजामध्ये भांडण लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचा करत असल्याचे सुद्धा खासदार कोल्हे यावेळी म्हणाले. कोल्हे यांनी राज्य सरकारने शिवस्वराज्य यात्रेचा धसका घेतल्याचे सांगितले. शिवस्वराज्य यात्रा सुरू झाल्या झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली महाजनादेश यात्रा सुरू केली. मुख्यमंत्र्याच्या अकोला यात्रे दरम्यान सहा शेतकऱ्यांनी विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या नेतृत्त्वावर जनतेचा हा अविश्वास असल्याचं यातून दिसून येते असं देखील म्हटले आहे.

सांगली आणि कोल्हापूरमध्ये भीषण पूरपरिस्थिती असताना भाजपचे नेते महाजनादेश यात्रेत व्यस्त आहेत. तर दुसरीकडे गिरीश महाजन नाचण्यात व्यस्त आहेत. जनतेची कामे करणं भाजपा  सरकारला जमत नाही. हे राज्यातील पूरस्थितीवरून दिसून येते आहे. आम्ही सरकारमध्ये असताना बोट घेऊन मदतीला जायचो, पालकमंत्र्यांच्या बैठका घ्यायचो, असं आ.अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र मुख्यमंत्री जिथे जातात तिथे कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते. राज्यात हुकूमशाही आणि दडपशाही सुरू असल्याचा आरोप सुद्धा पवार यांनी यावेळी सरकारवर केला.

कलम ३७० हटवून ढासळलेली अर्थव्यवस्था झाकण्याचा प्रयत्न तर नाही ना ? – अमोल कोल्हे

कोल्हापूरसाठी वाट्टेल ती मदत करायला उतरलोय, खा संभाजीराजे धावले पूरग्रस्तांच्या मदतीला