पिंपरी-चिंचवडकरांच्या मोठ्या समस्येत अमोल कोल्हेंनी घातले लक्ष

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा नियोजनात लक्ष घातले आहे. शनिवारी (२१ डिसे.) निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देत कोल्हे यांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे तसेच नगरसेवक दत्ता साने उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड परिसरातील पवना धरण पूर्णपणे भरलेले असतानाही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. महापालिकेने पाणीपुरवठा नियोजनात काय चुका केल्या आहेत, काय आडचणी आहेत इत्यादींची पाहणी करणार,असे त्यांनी सांगितले.

Loading...

महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा शहराला कधी पाणी टंचाई जाणवली नाही. त्यावेळी पावसाचे प्रमाण कमी असतानाही योग्य पद्धतीने पाण्याचे नियोजन केले जात असे. यंदा भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पवना धरणही भरलेले आहे. तरीही दिवसाआड पाणी सोडण्यात येते, हे कसले नियोजन आहे. असा सवालही कोल्हे यांनी उपस्थित केला.

धरण भरलेले असतानाही पाण्याची कपात केली जाते. मग,स्मार्ट सिटीत सगळी कामे नक्की स्मार्टली केली जात आहेत का,असा सवाल त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
#corona : केवळ लॉकडाऊन पुरेसे नाही, WHOने सुचवला आणखी एक पर्याय
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा