fbpx

… तोपर्यंत फेटा बांधणार नाही :अमोल कोल्हे

टीम महाराष्ट्र देशा:-बीड जिल्ह्यातील परळी आणि केज मतदारसंघात जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून येत नाही. तोपर्यंत मी बीड जिल्ह्यात आल्यावर फेटा बांधणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरु असून या यात्रेनिमित्त आंबेजोगाई येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

शिवस्वराज्य यात्रा परळीहून अंबाजोगाईला आली असता राष्ट्रवादीच्या नेत्या नमिता मुंदडा यांनी फेटा बांधण्यास घेतला असता त्यास नकार देत कोल्हे यांनी यावेळी एक निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले, परळी आणि केज मतदारसंघात आमचे आमदार जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत फेटा बांधणार नाही . तसेच जेव्हा आमदार होतील त्याचवेळी या व्यासपीठावर येऊन फेटा बांधेन असे धनंजय मुंडे म्हणाले.

परळी मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि केज मतदारसंघातून संगिता ठोंबर या विजयी झाल्या आहेत. या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या असून या दोन्ही जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीने आतापासून कंबर कसली आहे.