Amol Kirtikar | वडीलांची घरी समजूत काढलेली का?, अमोल कीर्तीकर म्हणाले…

Amol Kirtikar | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते गजानन कीर्तीकर (gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) हे उद्धव ठाकरे गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. याबाबत, गजानन कीर्तिकर यांची घरी समजूत काढली होती का?, असा सवाल अमोल यांना करण्यात आला होता. याबाबत त्यांनी उत्तर दिलं आहे.

गजानन कीर्तिकर हे माझे वडील आहे, त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी उद्धव ठाकरे यांना भेटून शिवसेनेसोबतच राहणार आहे, असं अमोल कीर्तीकर म्हणाले. तसेच पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रात काम करणार आहे. मागील दोन दिवसांमध्ये शिवसैनिकांचं प्रेम मिळत आहे. फोन करून लोकं सोबत असल्याचे सांगत आहे. त्यांच्या विश्वासाला तडा देणार नाही, असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, मी युवासेनेत काम करतोय, जर एखादा कार्यकर्ता नाराज झाला असता तरी त्याची समजूत काढली असती. त्या पद्धतीने निर्णय घेतला. आता गजानन कीर्तिकर यांचा विषय माझ्यासाठी संपला आहे, असं अमोल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Amol Kirtikar | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते गजानन कीर्तीकर (gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात प्रवेश केला …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics