जम्मू-काश्मीर : एक जवान शहीद तर चार जखमी

टीम महाराष्ट्र देशा : शहीद मेजर के. पी. राणे यांची बातमी ताजी असतानाच आणखी एक  जवान चकमकीत शहीद झाल्याचे वृत्त समोर येतय. दहशतवादी श्रीनगरच्या जट्ट बाटमालू परिसरात लपून बसले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी पूर्ण परिसर घेरलं. आपल्याला घेरलं असल्याची माहिती मिळतातच दहशतवाद्यांनी तुफान गोळीबार सुरू केला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला. तर सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असल्याचं वृत्त आहे.

जम्मू-काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरच्या बाटमालू परिसरात रविवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमक सुरू झाली. या चकमकीत एक जवाण शहीद झालाय तर सीआरपीएफ तीन जवान आणि दोन पोलीस जखमी झाले आहेत.

एल्गार परिषदेचं नक्सली कनेक्शन ?

BSF ने केला पाकिस्तानचा हिशोब चुकता