Amla and Curd | दही आणि आवळ्याच्या मदतीने केसांच्या ‘या’ समस्या होऊ शकतात दूर

Amla and Curd | टीम कृषीनामा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अनियमित आहाराच्या सवयीमुळे केसांच्या समस्या वाढायला लागल्या आहेत. या समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या प्रोडक्टचा वापर करतात. पण या प्रॉडक्टमुळे केसांना हानी पोहोचवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही पण केसांच्या समस्या दूर करण्यासाठी उपाय शोधत असाल तर तुम्ही आवळा आणि दह्याचा वापर करू शकतात. दही आणि आवळ्यामध्ये आढळणारे पोषक घटक केसांची काळजी घेण्यास मदत करतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही दही आणि आवळ्याचा हेअर मास्क वापरू शकतात. दही आणि आवळ्याच्या मदतीने केसांच्या पुढील समस्या सहज दूर होऊ शकतात.

केसातील कोंडा दूर होतो (Removes dandruff-Hair Care With Amla and Curd)

दही आणि आवळ्याच्या मदतीने केसातील कोंडा दूर केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही दही आणि आवळ्याचा हेअर मास्क वापरू शकतात. या दोन्ही गोष्टींमध्ये आढळणारे गुणधर्म केसातील कोंडा दूर करण्यास मदत करतात. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही आवळा आणि दह्याचा हेअर मास्क केसांना लावू शकतात.

केस गळणे थांबते (Hair loss stops-Hair Care With Amla and Curd)

आजकाल प्रत्येक दुसरा व्यक्ती केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त आहे. धूळ, प्रदूषण खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे केस गळण्याच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही दही आणि आवळ्याचा वापर करू शकतात. या दोन्ही गोष्टीच्या मदतीने केस गळणे थांबू शकते.

केसांच्या वाढीस चालना मिळते (Promotes hair growth-Hair Care With Amla and Curd)

तुम्ही जर केस वाढवण्याचा विचार करत असाल तर दही आणि आवळ्याचा हेअर मास्क तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. दही आणि आवळा केस गळती थांबवतात आणि केस वाढण्यास मदत करतात. नियमित यांचा हेअर मास्क वापरल्याने केसांच्या वाढीस चालना मिळू शकते.

आवळा आणि दह्याच्या मदतीने तुम्ही केसांच्या वरील समस्यांवर मात करू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील डाग दूर करून चमक वाढवण्यासाठी तुम्ही गुलाब जलचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.

गुलाब जल आणि ग्लिसरीन (Rose water and aloevera-For Skin Care)

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही गुलाब जलसोबत कोरफडीचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एलोवेरा जेलमध्ये गरजेनुसार गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण किमान अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. कोरफडीमध्ये आढळणारे अँटिबॅक्टरियल गुणधर्म चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करतात. कोरफड आणि गुलाब जल मिसळून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची चमक वाढू शकते.

गुलाब जल आणि ग्लिसरीन (Rose water and Glycerin-For Skin Care)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही गुलाब जलमध्ये ग्लिसरीन मिसळू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे गुलाबजलमध्ये तीन ते चार थेंब ग्लिसरीन मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. तुम्ही हे मिश्रण आठवड्यातून तीन वेळा चेहऱ्यावर लावू शकतात. या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवरील डागांची समस्या दूर होऊ शकते आणि त्वचेचा रंग सुधारू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Green Coffee | स्किन केअर रुटीनमध्ये करा ग्रीन कॉफीचा समावेश, मिळतील ‘हे’ अनोखे फायदे

Buttermilk and Jaggery | ताकासोबत गुळाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Cucumber Benefits | त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यासोबतच काकडी खाल्ल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Rose Water | चेहऱ्यावरील डाग दूर करून चमक वाढवण्यासाठी गुलाब जलसोबत वापरा ‘या’ गोष्टी

Immunity Power | इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय