‘अमितभाईंनी प्रथमच एक चांगले वक्तव्य केले आहे, फेक डिग्रीचा शोध घेतलाच पाहिजे’

manisha kayande

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता राजकीय वाद उफळून येत आहेत. अशिक्षित व्यक्ती ही देशावरचं ओझं असते असं मत अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे. आता यावरच शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी टीका केली आहे.

‘आमितभाईंनी आज प्रथमच एक चांगले व्यक्तव्य केले आहे. फेक डिग्रीचा शोध घेतलाच पाहिजे’ अशी खोचक टीका मनीषा कायंदे यांनी केली आहे. दरम्यान एक अशिक्षित व्यक्ती हा देशावरचं ओझं असतं. कारण त्याला ना संविधानाने दिलेल्या हक्कांची माहिती असते, ना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची’ असे विधान अमित शहा यांनी केले आहे.

त्यामुळे अशिक्षित व्यक्ती एक चांगली नागरिक कशी होईल? असा प्रश्न अमित शाह यांनी आपल्या मुलाखतीत उपस्थित केला आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याने आता राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या