अमिताभ यांनी घेतले ‘गोल्डन बॉय’ कडून भालाफेकचे धडे

amitabh

मुंबई : या आठवड्यातील ‘कौन बनेगा करोडपती 13’ च्या विशेष भागात, टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता  नीरज चोप्रा आणि पीआर श्रीजेश विशेष अतिथी म्हणून सामील होणार आहेत. दोन्ही खेळाडूंनी काही दिवसांपूर्वी हा विशेष भाग शूट केला आहे. शोमध्ये, नीरज आणि श्रीजेशने त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगितली तसेच त्यांनी तिथे खूप मजाही केली.

यावेळी नीरज चोप्राने अमिताभ बच्चन यांना हरियाणवी बोलायला शिकवले. अमिताभ बच्चन यांच्या तोंडून हरियाणवी मधील संवाद ऐकून सगळेच हसले. नीरज चोप्रा आणि अमिताभ बच्चन यांच्यात यावेळी बरीच चर्चा झाली.

या विशेष भागात नीरज चोप्रा आणि श्रीजेश यांनीत्यांच्या संघर्षाची कहाणी सांगितली. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांना किती संघर्ष करावा लागला हे त्याने सांगितले. श्रीजेशने 2012 मधील काही कडू आठवणी सांगितल्या. 2012 मध्ये हॉकी संघ एकही सामना जिंकला नाही तेव्हा त्याची खिल्ली उडवली गेली होती. तर दुसरीकडे, नीरज चोप्रानेही आपल्या संघर्षाबद्दल सांगितले. या भागात नीरज चोप्राने अमिताभ बच्चन याना भाला फेक शिकवले आणि भाला पकडण्याचे तीन मार्गही शिकवले. त्याचवेळी बिग बींनी श्रीजेशसोबत सेटवर हॉकीही खेळली.

महत्त्वाच्या बातम्या