fbpx

अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक, ‘लव्ह पाकिस्तान’ अशी पोस्ट व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा : बॉलिवूडचे महानायक आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर अकाउंट बरोबर धक्कादायक प्रकार झाला आहे. सोमवारी रात्री अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. तर हॅकर्सनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलचा प्रोफाईल फोटो बदलून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला होता. सोबतच बायोमध्ये ‘लव्ह पाकिस्तान’ असं लिहिलं होत.त्यामुळे अनेकांना बच्चन साहेबांचं ट्विटर पाहून सुरवातीला हादरा बसला व माध्यमांमध्ये खळबळ उडाली.

या घडल्या प्रकाराबाबत शोध सुरु आहे. मात्र अद्याप अकाउंट कोणी हॅक केलं याचा शोध लागलेला नाही. पण यामागे पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या हॅकरचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. ते नेहमीच त्यांच्या ट्विटर वरून त्यांचे विचार लोकांशी शेअर करत असतात. तसेच ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते नेहमीच त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. आता त्यांचं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची बातमी सोशल मीडियावर वेगानं पसरली आहे. बच्चन यांचे ट्विटरवर ३०७४ कोटी फॉलोअर्स आहेत.