महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनाला हरवलं, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

amitabh

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी नेगिटिव्ह आली आहे. त्यांना आज घरी देखील सोडण्यात आले आहे. यानंतर त्यांचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. याआधी अमिताभ यांची सुन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांचा देखील कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे बच्चन कुटुंबावर असलेलं कोरोनाचं संकट दूर होऊ लागलं आहे. याबद्दल त्यांचे पुत्र आणि अभिनेते अभिषेख बच्चन यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

11 जुलैला रात्री बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचं निदान झालं, त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले होते. यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटव्ह आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. दरम्यान आता आराध्या-ऐश्वर्यानंतर बिग बींवरील देखील कोरोनाचे संकट टळले आहे. लगेच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाह यांनीच ट्विटरद्वारे माहिती दिली. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हिड चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

‘कोरोनाचे सुरवातीचे लक्षण दिसल्याने मी कोरोनाची टेस्ट केली आणि ती पॉजिटिव आली आहे. माझी तब्बेत आता बरी आहे. मात्र डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी दवाखान्यात दाखल झालो आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्या आणि स्वतःला आइसोलेट करा’ अस ट्विट करत अमित शहा यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, दिल्लीतील एम्स रुग्णालयात अमित शहा यांच्यावर उपचार सुरु आहेत.

IMP