बाळासाहेब नसते तर आज मी जिवंत नसतो, आठवणींना उजाळा देत अमिताभ बच्चन झाले भावूक

blank

टीम महाराष्ट्र देशा : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७वा स्मृतीदिन आहे. शिवसैनिकांसोबत अनेक राजकीय पक्षांचे नेतेही शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देत आहेत. तसेच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अमिताभ यांनी १९८२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुली’ सिनेमातील अपघातानंतरचा किस्सा सांगितला. ‘बाळासाहेब नसते तर आज मी जिवंत नसतो,’ असे उद्गार अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमादरम्यान काढले.

तसेच शिवसेनेच्या रुग्णवाहिकेमुळे माझे प्राण वाचल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तेव्हा शिवसेनेची रुग्णवाहिका वेळेवर आली नसती तर माझी प्रकृती आणखी गंभीर झाली असती, असे बच्चन यावेळी म्हणाले.

दरम्यान, स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून स्मृतिस्थळावर जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसैनिकांसोबत अनेक राजकीय पक्षांचे नेतेही शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देणार आहेत. तर बऱ्याच नेत्यांनी ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.

मराठी मनामनात अस्मितेची मशाल प्रज्वलित करणाऱ्या आणि अवघ्या देशात हिंदुत्वाचा वन्ही चेतवणाऱ्या आपल्या लाडक्या साहेबांना मानवंदना देण्यासाठी लाखो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा अलोट जनसागर शिवतीर्थावर स्मृतिस्थळी उसळला आहे.

महत्वाच्या बातम्या