कृतज्ञ आहे मी… दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ‘बिग बी’ ची पहिली प्रतिक्रया

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या भारदस्त आवाजाने हिंदी चित्रपट सृष्टीत आपली ओळख निर्माण करणारे, ऑल इंडिया रेडीओतून आपल्या कारकिर्दीची सुरवात करणारे महानायक अमिताभ बच्चन यांना मंगळवारी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिलीच प्रतिक्रिया त्यांच्या ट्वीटरवरून दिली आहे.

आपल्याला मिळणाऱ्या या शुभेच्छा पाहून, ‘त्यावर नेमकं व्यक्त होण्यासाठी शब्दही कमीच पडत आहेत. मी कृतज्ञ आहे, तुम्हा सर्वांचे मी मनापासून विनम्रेतेने आभार मानतो’, असं ट्विट करत त्यांनी त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चित्रपट सृष्टीत मनाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. या बातमीवर शिक्कामोर्तब करत एक ट्विटही केलं. ज्यामध्ये त्यांनी बच्चन यांचं अभिनंदन केलं.

बिग बींना फाळके पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडिया आणि इतर सर्वच माध्यमांतून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र या साऱ्यामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे स्वतः अमिताभ बच्चन यांची यावर काय प्रतिक्रिया असणार? त्यावर आपल्या चाहत्यांची उत्सुकता ताणून न धरता त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत बच्चन यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. त्यांच्या याच कामगिरीसाठी आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. ‘बिग बी’, ‘अँग्री यंग मॅन’, ‘महानायक’ अशा विविध विशेषणांनी ओळख असणाऱ्या, कलाविश्वातील योगदानाने इतरांना सतत प्रेरणा देणाऱ्या या महानायकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...

Loading...

Loading...