अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीबद्दल मोठी बातमी

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांची तब्येत ठीक असून काळजीचं कारण नाही अशी माहिती नानावटी रुग्णालयातील सूत्रांनी दिलीय. तब्येत बिघडल्याने गेल्या दोन दिवसांपासून बिग बी नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी गुप्त ठेवण्यात आल्याने त्यांना भेटायला अद्याप एकही सेलिब्रिटी आलेला नसल्याचं सांगण्यात येतं. मात्र हे रुटीन चेकअप असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिलीय तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय.

आतापर्यंत अमिताभ, त्यांचं कुटुंब आणि त्यांच्या टीमकडून बिग बी यांच्या रूग्णालयात दाखल असल्याच्या बाबतीत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.नानावटी रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या सर्व सुविधा असलेल्या स्पेशल रूममध्ये त्यांच्यावर उपचार केले जात आहेत अशी माहिती समोर आली आहे .

अमिताभ यांचे जगभरात फॉलोअर्स आहेत.गेल्याच आठवड्यात अमिताभ यांचा वाढदिवस होता. या निमित्त त्यांच्या जलसा निवासस्थानी त्यांच्या हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. अमिताभ यांनी स्वत: या चाहत्यांना सामोरे जात त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला होता.

महत्वाच्या बातम्या