समीर चौघुलेच्या पुढे आदराने झुकले अमिताभ बच्चन

samir chughule

मुंबई : सोनी मराठी या वाहिनीवरील विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील सर्वच कलाकारांच्या कामाचे कौतुक केले जाते. नुकतेच महाराष्ट्राची हास्यजत्राच्या संपूर्ण टीमने बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेतली आहे. यावेळी समीर चौघुले आणि बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये चक्क अमिताभ बच्चन समीर चौघुले समोर आदराने झुकले असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर गेल्यावर समीर चौघुले बिग बींना म्हणाले की मला तुमच्या पाया पडायचे आहे. ‘तुम्ही नका माझ्या पाया पडू, मी तुमच्या पडतो’ असे अमिताभ म्हणाले. सध्या हा फोटो पाहून अनेकजण समीरचे कौतुक करत आहे.

दरम्यान,  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ २० सप्टेंबरपासून, सोमवार ते गुरुवार रात्री ९ वा. असे चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तर अभिनेत्री प्राजक्ता माळी सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये सूचसंचालन करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या