सोनी वाहिनी नंतर बीग बीनींही मागितली माफी

टीम महाराष्ट्र देशा : ‘केबीसी’तील बुधवारच्या भागात दुर्लक्षातून छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा संदर्भ दिला गेला. आम्ही या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेत आम्ही कालच्या भागात खेद व्यक्त करण्यासाठी एक स्क्रोल चालवला होता’ असं ट्वीट सोनी वाहिनीच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊण्टवरुन ट्विट करत सोनी वाहिनीने जाहीर माफी मागितली आहे.

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे ‘सोनी वाहिनी’ने जाहीर माफी मागितली आहे. केबीसी मध्ये स्पर्धकाला प्रश्न विचारताना ऑप्शनमध्ये शिवरायांचा ‘शिवाजी’ असा उल्लेख केल्यामुळे राज्यभरात संतापाची आत उसळली होती. तर सोशल मीडियावरही टीकेची झोड उठली होती.

त्यानंतर या रिअॅलिटी शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याप्रकरणी सोनी टीव्हीनंतर आता महानायक अमिताभ बच्चन यांनीही माफी मागितली आहे. ‘शिवरायांचा अनादर करण्याचा प्रश्नच नाही,’ असं अमिताभ यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :