fbpx

ठाकरे कुटुंबियांचा शाही सोहळा ; अमित ठाकरे अडकणार विवाह बंधनात

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे याचं आज लग्न आहे. लोअर परळ येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा पार पडणार आहे. दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांनी विवाहबद्ध होत आहेत या विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांसह, उद्योजक, बॉलिवूड स्टार हजेरी लावणार आहे.

राज ठाकरेंचे चुलतबंधू जयदेव ठाकरे सकाळपासूनच विवाहस्थळी उपस्थित आहेत लवकरच उद्धव ठाकरेही विवाहस्थळी दाखल होतील. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे देखील उपस्थित झाले आहेत.यांसह या विवाह सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, नारायण राणे, सपचे नेते अबु आसिम आझमी यांच्यासह इतर राजकीय नेते या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राजकीय नेत्यांच्या या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष वेधले गेले आहे. तसेच अंबानी कुटुंब, रतन टाटा आदी उद्योग जगतातील प्रसिद्ध व्यक्तीही उपस्थित राहणार आहेत.