विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच दोन युवा नेतृत्वांची भेट, एकत्र जेवण आणि सव्वा तास चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाचा राज्यात विविध राजकीय घडमोडी घडत आहेत. याचदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची भेटी झाली. सृजन फुटबॉल स्पर्धेसाठी ही भेट असल्याचे रोहित पवार यांनी म्हंटले आहे. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावरच दोन तरुण नेतृत्वांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींविरोधात राज्यात सभा घेतल्या राज ठाकरेंना कॉंग्रेस – राष्ट्वादी आघाडीत घेण्यासाठी शरद पवार प्रयत्न करत असल्याचे दिसत होते आणि विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना आघाडीत घेणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांचे नातू पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी पार्थ पवार यांच्या लोकसभा मतदार संघात महायुती विरोधात सभाही घेतल्या होत्या. परंतु शिवसनेचे श्रीरंग आप्पा बारणे यांनी त्यांचा दारूण पराभव केला होता.

शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवार हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

अमित ठाकरे आणि रोहित पवार यांची भेट ही सदिच्छा भेट असल्याचं म्हंटले जात आहे. या भेटी दरम्यान, त्यांनी सोबत जेवणही केले आहे, या संदर्भात रोहित पवार यांनी फेसबुक वर दोघांचा फोटोही शेअर करत मजकूरही पोस्ट केला आहे.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट

सृजन ‘ मार्फत वेगवेगळ्या क्षेत्रांना योग्य ते व्यासपीठ देण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. यांतर्गतच सृजन क्रिकेट , सृजन कबड्डी ,सृजन भजन असे विविध यशस्वी उपक्रम आपण राबविले आहेत.
संपुर्ण जगभरात लोकप्रिय असणारा फुटबॉल भारतात देखील आवडीने खेळला जातो. आपल्याकडे देखील उत्कृष्ट फुटबॉल खेळणारे अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहेत. या खेळाडूंना व्यासपीठ म्हणून ‘ सृजन फुटबॉल ‘स्पर्धेचे आयोजन येत्या ऑगस्ट महिन्यात केले आहे.

आज मुंबई येथे श्री.अमित ठाकरे यांची भेट घेऊन सृजन फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले , ते त्यांनी अत्यंत आनंदाने स्वीकारले देखील. फुटबॉल हा अमित ठाकरे यांचा आवडीचा खेळ असून ते स्वतः फुटबॉलचे चांगले खेळाडू देखील आहेत.

फुटबॉल सोबतच तरुणांच्या अनेक मुद्द्यांवर अमित ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. विशेषतः पक्षासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे तरुण कार्यकर्ते जे नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या भूमिकेविरुद्ध बाजू मांडत असतात त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी करण्याची गरज असलेल्या उपायांवर चर्चा झाली. युवक म्हणून पक्षबांधणीचे काम करत असताना आम्हाला या तरुण कार्यकर्त्यांचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजत आहेत. योग्य विचारांवर चालणाऱ्या , या विचारांचे समर्थन करणाऱ्या अशा तरुणांमागे आम्ही नेहमीच खंबीरपणे उभा असणार आहोत.