रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तर ऐकून अमित ठाकरेंनी टेकवले डोके

टीम महाराष्ट्र देशा: मुंबईच्या लोकल वाहतुकीत वारंवार येण्याऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे आणि मनसे नेते संदीप देशपांडेंनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. तर आपल्या मागण्यांवर रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरं ऐकून अमित ठाकरेंनी अधिकाऱ्यांपुढे डोकं टेकवले.

यावेळी अमित ठाकरे म्हणाले की, रेल्वेत महिला प्रवासी सुरक्षित नाहीत. सुरक्षेसाठी केवळ सीसीटीव्ही पुरेसे नाहीत. तर सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणं देखील गरजेचं आहे. दर रविवारी मेगाब्लॉक असतो. तरीही पावसाळ्यात वारंवार लोकलची रखडपड्डी होते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढणं गरजेचं आहे. प्रथम दर्जाच्या डब्यातही इतकी गर्दी असेल, तर मग त्या पासचा उपयोग काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे मुंबईकरांचे आयुष्य हे लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असते. मात्र गेले काही दिवस मुंबई लोकल ही मुंबईकरांची डोकेदुखी झाली आहे. लोकल मधून प्रवास करताना मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर रेल्वेचे धाबे दणाणतात त्यामुळे रेल्वे प्रशासन नक्की काय करत आहे, असा प्रश्न सामान्य मुंबईकर विचारात आहे.Loading…
Loading...