मनसैनिकांनी जिंकल मन, अमित ठाकरेंनी केलं कौतुक

blank

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात रविवारी (ता. ९ ) मनसेने आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने मनसैनिकांनी आझाद मैदानावर उपस्थिती लावली.

दरम्यान, या मोर्चात मोठ्या संखेने लोक मैदानावर आल्यामुळे प्रचंड कचरा झाला होता. मनसैनिकांनी मोर्चा संपल्यानंतर तो संपूर्ण परिसर स्वच्छ केला. याबाबत राज ठाकरेंचे  पुत्र अमित ठाकरे यांनी मनसैनिकांचं कौतुक करत फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे.

“आझाद मैदान येथील सभेनंतर तो संपूर्ण परिसर स्वच्छ करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना माझा सलाम..!!!”, अशा आशयाची पोस्ट टाकत अमित ठाकरे यांनी फेसबुकवर मनसैनिकांच कौतुक केलं आहे. दरम्यान, मनसेने बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात काढलेल्या मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातून मनसैनिक मुंबईत आले होते. राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसैनिक आपआपल्या शहरात-गावात निघून गेले. मात्र, यापैकी काही मनसैनिकांनी आझाद मैदानाचं स्वच्छता अभियान हाती घेतलं आणि संपूर्ण आझाद मैदान स्वच्छ केलं.