‘सोहराबुद्दीन’ चकमकी प्रकरणी अमित शाहांच्या अडचणीत होणार वाढ

amit shaha

मुंबई : सोहराबुद्दीन शेख प्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधातील याचिकेवर मंगळवारी हायकोर्टात सुनावणी होणार असून अमित शहा यांच्या अडचणीत वाढ होण्याची श्यक्यता आहे. शाह यांना या खटल्यातून आरोपमुक्त करण्याच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान न देण्याचं ठरवल्याने सीबीआयविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

गुजरात मध्ये सोहराबुद्दीन शेख, पत्नी कौसर बी आणि त्यांचे सहकारी तुलसीदास प्रजापती यांचा २००५ बनावट चकमकीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिस कर्मचाऱ्यांसह २३ आरोपींवर केस दाखल आहे. हे प्रकरण आधी सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. मात्र शाह यांना या खटल्यातून आरोपमुक्त करण्याच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान न देण्याचं ठरवल्याने. मुंबईतील वकिलांची एक संघटना बॉम्बे लॉयर्स असोसिएशनच्यावतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली असून त्याची सुनावणी मंगळवारी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी होणार आहे.

Loading...