“एक भारत-श्रेष्ठ भारत” अयोध्येच्या निकालानंतर अमित शहांनी दिली प्रतिक्रिया

टीम महाराष्ट्र देशा : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सकाळी १०:३० पासून याप्रकरणी सुनावणीस सुरुवात झाली. तसेच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आज निकाल देणार आहेत. यात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांचा समावेश होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्वपूर्ण निकालाचे देशवासीयांनी स्वागत केले आहे. तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीही सर्वोच्च निकालाचे स्वागत केले आहे. रामजन्मभूमीवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी एकमताने स्वागत करतो. मी सर्व समुदाय आणि धर्मातील लोकांना आवाहन करीत आहे की हा निर्णय सहजतेने स्वीकारावा आणि शांतता व समरसतेने भरलेल्या आपल्या “एक भारत-श्रेष्ठ भारत” या प्रतिज्ञेस प्रतिबद्ध रहा, असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.

Loading...

#आयोध्या निकाल सर्वोच्च न्यायालयाने मांडलेले मुद्दे

– बाबरी मस्जिद रिकाम्या जागी बांधली गेली नव्हती.

– निर्मोही आखाडा सेवक नाही,

– उत्खननात मंदिर संरचनेशी संबधित जुने अवशेष

– इस्लामिक कलाकृतीचे पुरावे आढळले नाही.

– मस्जिदच्या बांधकामात जुन्या दगडांचा वापर करण्यात आला होता.

– शेकडो वर्ष जुनी कलाकृती, मंदिराशी साधर्म्य साधणाऱ्या कलाकृती उत्खानात मिळाल्या आहेत.

– रामाचा जन्म अयोध्येत झाला यावर वाद नाही.

– वादग्रस्त जागेत हिंदूंची श्रद्धास्थाने, सीतेची स्वयंपाक घर, चौथरा, संरचनांचे अस्तित्व मान्य,

– हिंदूंच्या दाव्याला पुष्टी, रामलाल्लाचा ऐतिहासिक ग्रंथांमध्ये उल्लेख

– तट्रस्ट स्थापन करून राम मंदिर स्थापन करण्याचे आदेश

– अलाहाबाद न्यायालयाने दिलेल्या निर्णयात वादग्रस्त जमिनीचे तीन भाग चुकीचे

– ६७ पैकी ५ एकर जागा मुस्लीम पक्षकाराला

– सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी जागा देण आवश्यक आहे.

– भूमिकेमुळे हिंदू मुस्लीम वाद निर्माण झाला

– सीजेआयच्या अहवालानुसार स्वातंत्रपूर्व काळापासून हिंदू तिथे पूजा करत होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?