अमित शहांच्या पत्रातील माहिती धादांत खोटी – चंद्राबाबू नायडू

चंद्राबाबू नायडू यांचा अमित शहांवर पलटवार

टीम महाराष्ट्र देशा- अमित शहांनी त्यांच्या पत्रात आंध्रला केंद्राने अनेक वेळा निधी दिला असून आम्ही त्याचा उपयोग केला नाही असे म्हटले आहे. यावरुन आमचे सरकार आंध्रचा विकास करण्यात सक्षम नाही असेच त्यांनी याद्वारे सुचवले आहे. मात्र, मी त्यांना सांगू इच्छितो की, आमच्या सरकारचा जीडीपी उत्तम असून कृषी क्षेत्रासह अनेक पुरस्कार आम्ही पटकावले आहेत. ही आमची क्षमता आहे. त्यामुळे तुम्ही खोटं नाटं पसरवण्याचे काम का करीत आहात? असा सवाल टीडीपीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे तसेच भाजपाने आंध्र प्रदेश सरकारबाबत खोटी माहिती पसरवण्यास सुरुवात केली असून अमित शहांनी आपल्याला लिहिलेल्या पत्रातील माहिती धादांत खोटी असल्याचा पलटवार नायडू यांनी केला आहे.

काय म्हणाले चंद्राबाबू ?
भाजपा आंध्र प्रदेश सरकारबाबत खोटी माहिती पसरवण्यास सुरुवात केली असून अमित शहांनी आपल्याला लिहिलेल्या पत्रातील माहिती धादांत खोटी आहे. अमित शहांनी त्यांच्या पत्रात आंध्रला केंद्राने अनेक वेळा निधी दिला असून आम्ही त्याचा उपयोग केला नाही असे म्हटले आहे. यावरुन आमचे सरकार आंध्रचा विकास करण्यात सक्षम नाही असेच त्यांनी याद्वारे सुचवले आहे. मात्र, मी त्यांना सांगू इच्छितो की, आमच्या सरकारचा जीडीपी उत्तम असून कृषी क्षेत्रासह अनेक पुरस्कार आम्ही पटकावले आहेत. ही आमची क्षमता आहे. त्यामुळे तुम्ही खोटं नाटं पसरवण्याचे काम का करीत आहात?

दरम्यान आज टीडीपीला आंध्र प्रदेशच्या विकासाची काळजी नसल्यानं त्यांनी एनडीएपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा हा निर्णय पूर्णतः राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबूंनी नायडूंना पत्र लिहून सुनावलं आहे.

You might also like
Comments
Loading...