बिग बी अमिताभ बच्चन यांना अमित शहांच्या बाईक रॅलीचा फटका

मुंबई: आज भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत भाजपच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. दरम्यान, मेळाव्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बाईक रॅली प्रदर्शनामुळे मुंबईकरांना त्रास झाला. बिग बी अमिताभ बच्चन यांना सुद्धा बाईक रॅलीचा त्रास सहन करावा लागला.

याबाबत स्वतः अमिताभ यांनी ट्विटवरून माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी फिल्मसिटीतून आपल्या एका शूटचं पॅक अप झाल्यावर घरी जाण्यास निघाले. फिल्मसिटी ते त्याचं घरं हे अंतर अवघ्या अर्ध्या तासाचं आहे. पण काल त्यांना हेच अंतर पार करण्यासाठी तब्बल पाच तास लागले. अमित शाहा मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांच स्वागत करण्यात आलं. आणि शहरातून बाईक रॅली काढण्यात आला.

You might also like
Comments
Loading...