अमित शहा मुंबईत दाखल, सरसंघचालकांची घेणार भेट

टीम महाराष्ट्र देशा – मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक होत असतानाच भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे लक्ष लागून राहिले आहे.अमित शहा संघ कार्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार असल्याचे समजते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वणवा पेटला असून या मुद्द्यावर देखील चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Loading...

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शनिवारी विधिमंडळातील सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक विधान भवनात होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून या गटनेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकार आणि मराठा मोर्चाचे संयोजक यांच्यात मध्यस्थी सुरू केली असून, या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणण्याची तयारी दाखवली आहे.

 

तेंव्हा काँग्रेसने शरद पवारांसोबत काय केले, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला सवाल

मी गृहमंत्री असतो तर ‘त्यांना’ गोळ्या घातल्या असत्या ; भाजप आमदाराचे मुक्ताफळेLoading…


Loading…

Loading...