विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून शिवसेनेला ५० -५० चा फार्म्युला?

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘संपर्क फाॅर समर्थन’ अभियानांतर्ग काल सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. आगामी काळात होणाऱ्या निवडणूका, आणि सध्या पालघर पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ताणले गेलेले सबंध या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण होती.

दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास मॅरेथाॅन चर्चा झाली. बैठकीत मतभेद आणि मनभेद यावर चर्चा झाल्याचं कळतंय. दरम्यान या बैठकीमध्ये शिवसेनेची नाराजी दूर करून त्यांच्याशी युती करण्यासाठी अमित शहा यांनी येत्या विधानसभेसाठी शिवसेनेपुढे ५० – ५० चा फार्म्युला ठेवल्याचे वृत्त आहे. त्याचप्रमाणे यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा झाली. मात्र अद्याप याबाबत शिवसेनेने कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाहीये.

You might also like
Comments
Loading...