भाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी !

पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या काल पुण्यामध्ये दाखल झाल्या आहेत. आज दोन्ही संताच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी सकाळीपासूनच पुणेकरांची अलोट गर्दी लोटली आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

शनिवार आणि रविवारी या दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी आहेत. दरम्यान, पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त अमित शहा आले असता त्यांनी ज्ञानोबा माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले आहे.

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज, रविवारी दिवसभर पुण्यात मुक्काम करणार आहेत. पालखी सोमवारी (९ जुलै) सकाळी हडपसरच्या दिशेने रवाना होणार आहेत. दिंडीतील वारकऱ्यांसाठी शहरातील विविध संस्थांनी महाप्रसाद, आरोग्य तपासण्या, औषधवाटप, तसेच प्रवासास उपयोगी पडणाऱ्या वस्तूंच्या वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. हडपसरपर्यंत या पालख्यांची वाटचाल एकत्रित असेल, त्यानंतर तुकोबांची पालखी हडपसर-सोलापूर रस्तामार्गे लोणी-काळभोरकडे जाईल, तर माऊलींची पालखी दिवेघाटातून सासवड मुक्कामी निघेल.

भाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी !

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले

You might also like
Comments
Loading...