भाजपच्या गडाला सुरूंग; मोदी-शहा मैदानात

टीम महाराष्ट्र देश : तीन राज्यांतील दारुण पराभवानंतर आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी-शहा जोडी पुन्हा एकदा मैदानात उतरताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज लातूरमध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहांची या निवडणुकी संदर्भातच बैठक घेणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जानेवारीला सोलापूरात रॅली आणि सभा होणार आहे.

पाच राज्याच्या निवडणुकांच्या निकालावरून भाजपच्या गडालाच सुरूंग लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच मोदी-शहा हि जोडी सावध झाली आहे. त्यांनी आत मोर्चा  दक्षिणेकडे वळवला आहे. आज लातूरमध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा लोकसभेची तयारी, उमेदवार यासह विविध गोष्टींचा आढावा घेणार आहेत. तर नरेंद्र मोदी हे सोलापुरात विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. त्यासोबत ते महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा करणार असल्याचीही माहिती मिळत आहे.त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

नुकतीच शहांची दिल्लीत खासदारांसमवेत बैठक झाली आहे. त्यात त्यांनी युतीचे नंतर बघु, सर्व जागांसाठी तयार रहा म्हणत मित्र पक्ष असणार्‍या शिवसेनेला स्वबळावर निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. आजची बैठक लातूर मध्ये स्थानिक नेत्यांसमवेत होत असली तरी या बैठकीत युतीबाबत चर्चा निश्चित होणार आहे. खरंतर मोदी-शहांचा हा महाराष्ट्र दौरा भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना बळ देणारा ठरणार आहे.

अमित शहा स्वबळाची भाषा करत असले तरी त्यांचा तीन राज्यांतील पराभवामुळे खचलेला आत्मविश्वास बिहारच्या वाटाघाटीत दिसत असला तरी ते महाराष्ट्रात मात्र लपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दुसरीकडे शिवसेना सत्तेत सोबत राहुन भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.मात्र हा शिवसेनेचा युतीमध्ये जागा वाढवून मिळण्यासाठी केविलवाणा प्रयत्न असल्याचे समोर येत आहे.त्यामुळे युती होणार हे जरी निश्चित असले तरी कोण कुणापुढे नमते घेणार ते लवकरच कळेल.